पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची बदली, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाई पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे यांची मागील महिन्यांत त्यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. शिवजयंती बंदोबस्त संपल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशात जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांना नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सांगली पोलीस दलातून नव्याने दाखल झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची वाई पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी सायंकाळी वाई पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
यावेळी वाई पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचे वाई पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी स्वागत केले. पदभार घेताच वाई पोलीस ठाण्याचा त्यांनी आढावा घेतला. वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमके कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचे प्रमाण किती आहे. तसेच डीबी पथकांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली. पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील सर्व बेकायदेशीर अवैध धंदे व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न राहील तसेच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच सण उत्सव या काळात ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे प्रतिपादन नूतन पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.