पिंपोडे बुद्रुक येथे युवकाचा निर्घ्रुण खून
अज्ञात संशयित फरार
संभाजी पुरीगोसावी
कोरेगांव : खरा पंचनामा
कोरेगांव तालुक्यांतील पिंपोडे बुद्रुक येथे ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात व तोंडावर खलबत्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारांस ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे उत्तर कोरेगांव तालुक्यांच्या भागात खळबळ उडाली आहे.
भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय २४, रा. पिंपोडे बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरुन पिंपोडे बुद्रुक गावाच्या उत्तरेला दोन किलोमीटरवर परगणा वस्ती आहे. वस्तीच्या अलीकडे नव्याने बांधलेल्या श्री. घुमाई देवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावर मळा नावाच्या शिवारात भगवान कालपासून आपल्याच शेतात मधील ज्वारीची काढणी करत होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तो एकटाच ज्वारी काढण्यासाठी गेला होता.
दुपारी बारा वाजता त्याची आई जेवणाचा डबा घेवुन गेली. यावेळी तिने शेतात आपल्या मुलाचा म्हणजे भगवान यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरली.
या घटनेची माहिती वाठार पोलिसांना समजताच वाठारचे सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर साताऱ्याहून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी श्वानाला शेतात पडलेल्या खलबत्त्याच्या ठोंब्याचा वास देवुन मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वान परगणा वस्तीपर्यंत जाऊन घुटमळले. मयत भगवान सपकाळ हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील मच्छिंद्र आणि आई शेती व मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करायचे,भगवान व त्याचा लहान भाऊ अभिजीत हा शेतीकामात त्यांना मदत करत. भगवानने गावातील खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम केले होते.
सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्याप खून कोणत्या कारणांतून झाला हे मात्र अस्पष्टच आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोकराव हुलगे अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.