पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. रोहिदास अशोक जाधव (वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
काही दिवसांपूर्वी रोहिदास ने ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलं होतं. यानंतर त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शिवीगाळ आणि मारहाण झाल्यानंतर तरुणाच्या तक्रारी नंतर लोणीकंद पोलीसांनी मारहाण करणाऱ्यां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण झाली माही म्हणून २८ वर्षीय तरुणाने वाघोली पोलीस चौकी समोर स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तो ९० टक्के भाजला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.