अशोक चव्हाण यांचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर?
नार्वेकरांची भेट घेतल्यानं चर्चाना उधाण
मुंबई : खरा पंचनामा
मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकींनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राहुल नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. या वेळी अशोक चव्हाणांनी नार्वेकरांकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. शिंदे- फडणवीस-पवार सरकारमध्ये अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे.
याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "पुढील काळात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार आहे. त्यामुळे काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही मिळणार नाहीत. उद्धव ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. शरद पवार यांच्या पक्षाचीही हीच स्थिती आहे. वंचितमधील मोठे नेतेही भाजपत प्रवेश करणार आहेत," असं बावनकुळेंनी म्हटलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.