जळगांव जिल्ह्यातील गुन्हेगारी सत्र मोडीत काढणार
नूतन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी
संभाजी पुरीगोसावी
जळगांव : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीनंतर जळगांव जिल्हा पोलीस दलाचा पदभार डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वीकारला आहे. जळगांव जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी तसेच चोरी करणाऱ्यांची शिरजोरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. समाज व प्रशासनाच्या हिताच्या दृष्टीने कठोर पावले उचलली जाणार आहेत. त्यात कुठलीही तडजोडी केली जाणार नाही असे डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जळगांव जिल्ह्यामध्ये तरसोद फाट्याजवळ अनधिकृत वाळू उपसा करणा-या वर कारवाईसाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या ६ संशयितांना गुरुवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने काही जणांना पाच दिवसांची अर्थात १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यावर हल्ला झाला. यामध्ये आणखीन सहा जणांना अटक करुन आरोपींवर दरोड्याची कलमे लावणार आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची धडाकेबाज आयपीएस अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात चांगलीच ओळख आहे. त्यांनी आत्तापर्यंत विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या धडक कारवाईमुळे जळगांव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणार आहे. तसेच गुन्हेगारी देखील मुक्त होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.