अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.
तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.