पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा डॉ. सुहास दिवसे यांनी स्वीकारला पदभार
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा डॉ. सुहास दिवसे यांनी आज पदभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख यांनी कार्यभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली आहेत. काल पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर क्रिडा युवक कल्याणच्या आयुक्तपदी डॉ. राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे.
डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध महत्त्वांच्या पदावर काम पाहिले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रश्नांची त्यांना चांगलीच माहिती आहे. पुणे जिल्ह्यात क्रीडा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. खेड प्रांत अधिकारी म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. डॉ. सुहास दिवसे हे २००९ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत.
पीएमआरडीए विकास आराखडा मार्गी लावण्यामध्ये डॉ. दिवसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या मर्जीतील जवळचे अधिकारी म्हणून देखील डॉ. सुहास दिवसे यांची ओळख आहे. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आहेत. मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत त्यांनी पुणे जिल्हाधिकारी म्हणून जवळपास साडेतीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.