'वर' 'मान' असलेला 'राजा' अखेर निलंबित
कथित सम्राटाचे प्रकरण आले अंगलट
सांगली ः खरा पंचनामा
जिल्ह्यात बदनाम झालेला कथित सम्राटाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा 'वर' 'मान' असलेल्या 'राजा'ला अखेर निलंबित करण्यात आले आहे. दुष्काळी टापूत वरचष्मा असणाऱ्या या अनभिषिक्त राजाला बुधवारी रात्री उशीरा निलंबित केल्याचे संबंधित खात्यात समजले. सम्राटाचेच प्रकरण त्याच्या अंगलट आल्याचीही चर्चा आहे. दरम्यान खरा पंचनामाने दिलेल्या वृत्तामुळेच या राजावर कारवाई झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
या राजाने स्वःताच्या घरातील चोरी तर लपवलीच पण त्याच्या यापूर्वीच्या अनेक प्रभारींनाही त्याने चुना लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुष्काळी भागात प्रभारी म्हणून काम केलेल्या अनेक प्रभारींनी त्याच्यापासून चार हात दूर राहणेच पसंद केले होते. या राजाच्या करामतीची चर्चा जिल्ह्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत होत आहे. आता सम्राटाला वाचवण्यासाठी त्याच्याकडून घेतलेला मलिदा राजाला परत द्यावा लागणार आहे. त्यात घरातील चोरीतही त्याचे बरेच नुकसान झाले आहे. त्यामुळे या राजाचे ग्रह आता फिरले आहेत अशीची चर्चा त्याच्या खात्यात आहे.
एकंदरीत या राजाची 'मान' अखेर खाली झाली यामुळे त्याच्या दुष्काळी टापूतील अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. सम्राटाच्या प्रकरणासह वरीष्ठांच्या गोपनीय अहवालामुळे या राजाला अद्दल घडल्याची चर्चा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.