आरोपींची जेलमध्ये अधिकाऱ्याला बेदम मारहाण
पुणे : खरा पंचनामा
येरवडा कारागृहातील कैद्यांनी अधिकाऱ्याला कारागृहातच बेदम मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे. पठाण असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात आंदेकर टोळीतील आरोपींनी कारागृह अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत संबंधित अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. कारागृह आधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.
ही घटना आज सकाळी येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये घडली. विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे हे दोघे ही सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनी आज किरकोळ कारणावरून १० इतर गुंडाना घेऊन शेरखान पठाण यांना मारहाण करायला सुरुवात केली.
या घटनेत पठाण यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली तर उजवा हाथ फॅक्चर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.