Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील २३ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या सोलापूर शहरचे मानसिंग खोचे यांची कोल्हापूरला नियुक्ती

राज्यातील २३ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या
सोलापूर शहरचे मानसिंग खोचे यांची कोल्हापूरला नियुक्ती



मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील पोलिस प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. सोमवारी राज्यातील २३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत. इचलकरंजी एलसीबीचे तत्कालीन प्रभारी अधिकारी मानसिंग खोचे यांची सोलापूर शहर येथून कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. अपर पोलिस महासंचालक (आस्थापना), संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने सोमवारी बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. 

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली : अमर चौरे (एटीएस ते वाशिम), ऋषिकेश अधिकारी (सिंधुदुर्ग ते पुणे ग्रामीण), अतुल येरमे (मुंबई शहर ते छत्रपती संभाजीनगर), घनशाम सोनावणे (विशेष सुरक्षा विभाग ते सातारा), उत्तम भजनावळे (मुंबई शहर ते पुणे शहर), नरेश रणधीर (लोहमार्ग मुंबई ते यवतमाळ), संग्राम ताटे (मुंबई शहर ते छत्रपती संभाजीनगर), मारूती शेळके (मुंबई शहर ते धाराशिव), प्रविण खंडारे (मुंबई शहर ते वाशिम), विजय घेरडे (लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ते कोल्हापूर), युवराज नांद्रे (विशेष सुरक्षा विभाग ते पुणे शहर), घनशाम बल्लाळ (नागरी हक्क संरक्षण ते सातारा).

पंडित रेजितवाड (एसीबी ते पुणे शहर), जगदीश परदेशी (पीटीसी अकोला ते एसीबी), बालाजी कुकडे (विशेष सुरक्षा विभाग ते सोलापूर ग्रामीण), निवृत्ती बोऱ्हाडे (मुंबई शहर ते रायगड), दादासो एडके (पीटीसी मरोळ ते ठाणे ग्रामीण), निळकंठ जगताप (मुंबई शहर ते पुणे शहर), अरूण देवकर (एसआयडी ते सिंधुदुर्ग), राजाराम चव्हाण (एसआयडी ते रत्नागिरी), अनिरूद्ध पुरी (नागपूर शहर ते अमरावती शहर), ब्रम्हानंद नाईकवाडी (सीआयडी ते नवी मुंबई).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.