राज्यसभेची निवडणूक महाराष्ट्रात बिनविरोध होणार? कुणाकडे किती संख्याबळ ?
मुंबई : खरा पंचनामा
15 राज्यातील राज्यसभेच्या 56 जागा रिक्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार असूनत्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश आहे.
यामध्ये भाजपचे 3, काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि ठाकरे गटाचे एक अशा 6 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र, निडवणूक होण्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्यात भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही व्ही मुरलीधरन, हे खासदार निवृत्त होणार आहेत. तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनिल देसाई, काँग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचाही कार्यकाळ संपत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजप 3, शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि काँग्रेस 1 असे उमेदवार राज्यसभेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.