Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है!

दहा वर्षे ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है!



मुंबई : खरा पंचनामा

राज्याभिषेक झाल्यानंतर एकही दिवस शिवाजी महाराज घरी स्वस्थ बसले नाहीत, पीएम मोदी देखील एकही दिवस घरी बसले नाहीत, 10 वर्षे आपण मोदींचे राज्य आपण पाहिले, एक मजबूत भारत या काळात झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणा की, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे नेतृत्व करणारे नड्डा आज मुंबईत आहेत. राष्ट्रीय बैठक झाली तेव्हा समारोप करताना मोदींनी एक सुंदर वाक्य सागितले की तिसऱ्यांदा आम्ही सरकार तयार करणार आहोत.

ते पुढे म्हणाले की, आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे. भारताच्या तरुणाईला या काळात कर्ज मिळाले. दहा वर्षे ट्रेलर होत पिक्चर अभी बाकी है. पुढील पाच वर्षे भारत जगाचे नेतृत्व करणारे असणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते म्हणून मोदींनी 100 दिवस मागितले, भारताला मजबूत सरकार देणे हे आपले उद्दिष्ट आहे.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, 25 वर्षात उद्धव ठाकरेजी मुंबईकरांसाठी केलेले काम दाखवा. मुंबईत लोक कोणाच्या पाठीशी आहेत हे आता यांच्या लक्षात येईल. मुंबईमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आपल्या सोबत आहे. मुंबईची मेट्रो, कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावे लागले. मी एका उबाठा नेत्याशी बोलत होतो, त्याला म्हणालो काय केलं तुम्ही? 25 वर्षात काही कर्तृत्व नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.