अट्टल पाच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
लाखोंचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलिसांची कारवाई
बीड : खरा पंचनामा
चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध गांवात जबरी चोरी, दरोडा असे प्रकार घडत होते. याच गुन्ह्यातील पाच अट्टल दरोडेखोरांच्या मोठ्या शिताफितीने चकलांबा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली.
दीपक गौतम पवार, गोविंद गौतम पवार, राजेश दिलीप भोसले (सर्व रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपति संभाजीनगर), नितीन मिश्रा चव्हाण (रा. जोड मालेगाव, ता. गेवराई, जि. बीड), किशोर दस्तगीर पवार (रा. पैठण, जि. छत्रपति संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मागील काही दिवसात चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन जबरी चोरीचे तसेच पाच रात्रीच्या घरफोड्या, एक दिवसाची घरपोडी झाली. यातील संशयिताना पकडण्यासाठी आहे. चकलांबा पोलिसांचे पथक गस्त घालत होते.
पथकाने खबऱ्याने दिलेली माहिती आणि तांत्रिक तपास करत 5 जनाना अटक केली. त्यांच्यावर दरोडा घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, श्री. गाडे, श्री. बारगजे, श्री. केदार, श्री. खेडकर, श्री. खेत्रे, श्री. घोंगडे आदिनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.