Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उत्तरेकडे थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला; राज्यात थंडीचा कडाकाही वाढणार

उत्तरेकडे थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढला; राज्यात थंडीचा कडाकाही वाढणार



पुणे : खरा पंचनामा

यंदाचे तापमानवाढीचे वर्ष असून थंडीचा जास्त कडाका जाणवणार नाही, असा अंदाज आहे. त्याप्रमाणे यंदा राज्यात फारशी थंडी जाणवत नाही. मात्र, आता आठवड्याभरात राज्यात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. पुण्यामध्ये यंदा दुसऱ्यांदा किमान तापमान घसरण झाली आहे. दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन राज्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बदलत्या हवामानानुसार गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आता दोन दिवसांमध्ये दुपारी उन पडत असल्याने थंडी कमी झाली होती. मात्र, आता उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने पुन्हा एकदा राज्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. देशाच्या पश्चिमी भागात वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याची वाटचाल पुर्वेकडे आहे. एक प्रभावी चक्रीय हवा राजस्थानमध्ये तयार झाली आहे. तसेच उत्तर हिंदुस्थानातही अशीच स्थिती असल्याने महाराष्ट्रात आर्द्रता येत आहे. उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. 3 फेब्रुवारीपासून किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या 48 तासांमध्ये तापमानात 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.