Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट नोटा बाळगणाऱ्या रूकडीच्या तरूणास सक्तमजुरीची शिक्षा

बनावट नोटा बाळगणाऱ्या रूकडीच्या तरूणास सक्तमजुरीची शिक्षा



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाचशे रूपयांच्या बनावट नोटा बाळगून त्या खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रूकडी (ता. हातकणंगले) येथील तरूणास पाच वर्षे सश्रम कारावास, पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. इतर आरोपींना मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. सांगलीतील तदर्थ सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. पोतदार यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व्ही. एम. देशपांडे यांनी काम पाहीले. 

सचिन बाबासाहेब कांबळे (वय २७, रा. आंबेडकरनगर, रूकडी, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्या नाव आहे. या गुन्ह्यात आण्णा उर्फ समीर उर्फ मानसिंग यशवंत सावंत हा फरारी आहे. तर मनोहरालाल गोधेजा, विनायक कुंभार, रायाप्पा गडकरी, सुहास जाधव उर्फ युवराज पाटील हे चौघे आरोपी खटला सुरू असताना मयत झाले आहेत. दि. १७ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी सचिन कांबळे सांगलीतील बसस्थानक परिसरात पाचशे रूपयांच्या २४ बनावट नोटा जवळ बाळगून त्या खपवण्यासाठी तो सांगलीत आला असता पोलिसांना सापडला होता. या नोटा त्याने गांधीनगर येथील बबलू उर्फ हरेश याच्याकडून घेतल्या होत्या. 

याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक के. जी. घाडगे यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने सादर केलेल साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्या. पोतदार यांनी कांबळे याला दोषी धरून शिक्षा सुनावली. या खटल्यात सांगली शहर पोलिस ठाण्यातील प्रकाश डांगे, शशिकांत कलकुटगी, सीमा धनवडे, स्वप्ना गराडे यांनी मदत केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.