Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक, तीन गुन्हे उघड १२.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक, तीन गुन्हे उघड
१२.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

सांगली शहरात विविध ठिकाणी चोरी, घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने असा १२.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

स्वप्नील मोहन तरसे (वय ३१, रा. बुधगाव, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक श्री. शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल स्वप्नील तरसे हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील उद्योग भवनजवळ येणार असल्याची माहिती पथकातील बिरोबा नरळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने उद्योग भवन परिसरात सापळा रचला होता. तेथे स्वप्नील प्लास्टीकची पिशवी घेऊन उभा असल्याचे पथकाच्या निदशर्नास आले. पथकाने तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळच्या प्लास्टीकच्या पिशवीत सोन्या-चांदीचे दागिने सापडले. दागिन्यांबाबत त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने ती विश्रामबाग आणि संजयनगर परिसरातील घरे फोडून चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने जप्त करण्यात आले. त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, विक्रम खोत, उदयसिंह माळी, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.