Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फसवणूक झालेली १९ लाखांची रक्कम तक्रारदाराला केली परत

फसवणूक झालेली १९ लाखांची रक्कम तक्रारदाराला केली परत



सांगली : खरा पंचनामा

कमी दरात सोने देतो असे सांगून पुण्यातील एकाची सांगलीत २५ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. यातील संशयितांकडून जप्त केलेली १९.५० लाखांची रक्कम तक्रारदाराला परत देण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

मयुर सुभाष जैन (वय ३९, रा. शिवाजीनगर, पुणे) यांना कमी दरात सोने देतो असे सांगून काही भामट्यांनी त्यांना सांगलीत बोलावून घेतले. ते सांगलीत आल्यानंतर त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड काढून घेण्यात आली होती. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली होती. याप्रकरणी जैन यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना तातडीने हालचाली करत अटक केली होती. 

त्या संशयितांकडून फसवणूक झालेल्या रकमेपैकी १९.५० लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. गुरुवारी यातील तक्रारदार मयुर जैन यांना ती रक्कम निरीक्षक संजय मोरे यांनी परत दिली. यावेळी मुद्देमाल कारकून सीमा धनवडे उपस्थित होत्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.