अज्ञात तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
नागज येथील घटना, पोलिस तपास गतीने
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे एका अज्ञात तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह शनिवारी आढळून आला. या तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून अज्ञातांनी खून करून डिझेल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या तरूणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच या घटनेचा छडा लावला जाईल असे एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.
नागज येथील माळरानावर एका तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह पडल्याची माहिती ग्रामस्थांनी कवठेमहांकाळ पोलिसांना दिली. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांसह एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह अर्धवट जळाल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मृताच्या खिशात दुचाकीची एक चावी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील कोणी तरूण बेपत्ता झाला आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच याच्या तपासाला गती येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी दुचाकीच्या टायरच्या खुणा पोलिसांना आढळल्या असून त्या भागात शुक्रवारी रात्री आलेल्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.