तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिट लंपास
पुणे : खरा पंचनामा
ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाली आहे.
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.