नरसिंह राव, डॉ. स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह यांना 'भारतरत्न'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील दोन महान नेत्यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.
त्यामध्ये, बिहारचे सुपुत्र कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारत रत्न सन्मान जाहीर झाला. आता, देशासाठी योगदान देणाऱ्या आणखी तीन भूमिपुत्रांच्या नावांची मोदींनी घोषणा केली असून त्यामध्ये, डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचाही गौरव करण्यात आला आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्यासह देशाची माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या दिवंगत चौधरी चरणसिंह यांनाही भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा मोदींनी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देशातील या ३ भूमिपुत्रांना भारत रत्न देण्यात येत असल्याचे जाहीर केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.