अवैध धंदे आढळल्यास ठाणे प्रमुखांवर कारवाई करणार
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा इशारा
संभाजी पुरीगोसावी
पुणे : खरा पंचनामा
पुणे ग्रामीण विभागाचे तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या बदलीनंतर डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी असा लौकिक असलेले, धडाकेबाज आयपीएस अधिकारी पंकज देशमुख यांनी दिनांक १ फेब्रुवारी रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
पुणे जिल्ह्यात अवैध धंदे चालणार नाहीत याबाबत माझा कटाक्ष आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध धंदे सुरु असल्याचे निष्पन्न होईल, ज्या पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखावर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात सामान्य माणसाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे गुन्हेगाराला कायद्याचे भय असावे, कायदा पाळणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस आहेत. पोलीस आपले मित्र असल्याची भावना प्रत्येकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न राहील असेही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुंडांची कुंडली तयार होणार आहे. त्या अनुषंगाने देखील कारवाईचा बडगा सुरुच राहणार नारायणगांव (ता. जुन्नर) येथे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते म्हणाले की, १४ नोव्हेंबर रोजी अनंत पतसंस्थेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या दरोड्याचा व त्या संस्थेच्या व्यवस्थापकांच्या खुनाचा तपास पोलिसांना अद्याप लागला नाही याची खंत पोलीसांना आहे. नव्याने तपास केला जाईल व गुन्हेगारांचा तपास लावू गुन्ह्यात अथवा अपघातातील अनेक वाहनांचा साठा प्रत्येक पोलीस ठाण्यात पाहायला मिळतो, याची देखील योग्य पद्धतीने विलेवाट लावली जाईल, जेणेकरून पोलीस ठाण्याच्या आवारात या वाहनांचा अडथळा ठरणार नाही तसेच पुणे ग्रामीण विभागांच्या सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणारे अवैध धंदे चालणार नाहीत याची देखील दखल पुणे ग्रामीण पोलीस घेणार आहे. तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सुरु असल्यांचे निष्पन्न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.