Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांनी दाखवली केराची टोपली? सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रिल्स टाकणं सुरूच

पोलिस आयुक्तांच्या आदेशाला गुंडांनी दाखवली केराची टोपली? 
सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रिल्स टाकणं सुरूच



पुणे : खरा पंचनामा

पुणे पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार अमितेश कुमार यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली आहे.

अमितेश कुमार यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात शहरातील सराईत गुन्हेगारांची परेड घेतली होती. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून त्यांना तंबी देण्यात आली होती.

परंतु, पुणे पोलिसांच्या आदेशाला या सराईत गुन्हेगारांनी डावलल्याचं दिसत आहे. गुन्हेगारांच्या परेड नंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच आहे. पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स टाकणे अद्यापही सुरू आहे.

पुणे पोलिसांनी निर्देश दिल्यानंतर काही तास उलटायच्या आतच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळ याचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड झाल्याचं समोर आलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.