मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ निलंबित!
गोळीबार प्रकरणात कारवाई, पैशाच्या कलेक्शनवरुन झाला होता वाद
मुंबई : खरा पंचनामा
मोटार वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना परिवहन खात्याने निलंबित केले. त्यांच्यावर सीमा तपासणी नाका, कांद्री (मनसर) येथे कार्यरत असताना २०२३ मध्ये खासगी व्यक्तीकडून लाच घेण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेजवळ या सुरवातीपासूनच वादग्रस्त अधिकारी राहिल्या. २०१६ मध्ये त्या उस्मानाबाद येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे कार्यरत होत्या. त्यावेळी शेजवळ यांना वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण प्रकरणात त्यांना निलंबित केले होते. दोन वर्षे निलंबित राहिल्यावर त्यांना नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली देण्यात आली. त्यांची सेवा नागपूर ग्रामीण येथील सीमा तपासणी नाका (कांद्री) येथे लावली गेली.
येथेही त्यांनी खासगी व्यक्तीकडून लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणातही त्यांच्यावर नागपूर ग्रामीणच्या रामटेक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. त्यानंतर बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत संकेत गायकवाड या मोटार वाहन निरीक्षकावर गोळी झाडण्यात आली. गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आल्यावर शेजवळ आणि संकेत गायकवाडवर गुन्हा दाखल केला होता.
मात्र, शेजवळ या फरार होत्या. यापूर्वीही त्यांना निलंबित करण्यात आले. शेजवळ यांनी संकेतवर गोळी झाडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी शेजवळ व गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला. गायकवाड यांनाही परिवहन आयुक्त कार्यालयाने निलंबित केल्याची माहिती आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.