पोलीस व्हायला आला अन् जयसिंगपूरचा तरुण पाच वर्षांसाठी जेलमध्ये गेला!
पुणे : खरा पंचनामा
लोहमार्ग पोलीस दलात उमेदवार भरती प्रक्रिया सुरू आहे. याठिकाणी भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सागर लालसिंग राठोड (वय ३१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे लोहमार्ग पोलीस दलातील भरती प्रक्रियेत राठोड याने बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात राठोडविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान, सरकार पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने राठोडला विविध कलमांन्वये दोषी ठरवले. त्याला खडकी न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.