लोकसभेला मीच उभा आहे असे समजून माझ्या उमेदवाराला विजयी करा
बारामती : खरा पंचनामा
गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले, यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे. असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमात पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट बारामती लोकसभा मतदारसंघात आमने सामने येणार असल्याचे संकेत दिले. पवार म्हणाले, मी केलेल्या विकास कामांची मला जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहा. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा. नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातचं बारामती लोकसभा उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे. शकतील, अशा स्वरूपाची चर्चा बारामतीत सुरू झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.