पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोस्टर फाडली
पुणे : खरा पंचनामा
शिवजयंती निमित्ताने किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. यातील अनेक बोर्ड अज्ञाताकडून फाडण्यात आले आहेत. या प्रकारानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून तर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत गाडी रोडच्या कडेने असलेल्या विद्युत पोलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले अनेक बोर्ड लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक बोर्ड अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना किल्ल्यावर येऊन देणार नाही असा इशारा मराठा मोर्चाच्या वतीनं देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच प्रवेश देखील नाकारण्यात आला आहे. यामुळे मराठा मोर्चाचे आंदोलक नाराज होते. याच नाराजीमधून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला लावण्यात आलेले बोर्ड फाडण्यात आले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.