Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदींच्या सभेत खुर्चीवर राहुल गांधी? यवतमाळच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांची धावपळ

मोदींच्या सभेत खुर्चीवर राहुल गांधी? 
यवतमाळच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांची धावपळ



यवतमाळ : खरा पंचनामा

यवतमाळमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पण या सभेत लावण्यात आलेल्या खुर्थ्यांवर राहुल गांधी यांचे स्टीकर लावण्यात आलेले होते. खळबळ निर्माण झाल्यानंतर या खुर्थ्यांवरील स्टीकर्स काढण्यात आले.

यवतमाळमध्ये आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे स्टीकर खुर्चीवर असल्याने नेमकी सभा कुणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे चर्चेला एकच उधाण आले आहे होते.

आमचा लढा 138 वर्षांचा असं या खुर्ध्यावर लिहिण्यात आले आहे. तसेच यावर स्कॅन केलेला लोगो पण आहे. असंही सांगितल्या जातंय की खासदार राहुल यांची नागपूर येथे सभा झाली. त्याचं कंत्राटदराने या खुर्ध्या पुरविल्या आहेत आणि त्यावरील पोस्टर न काढता नजरचूकीने या खुर्ध्या पाठवण्यात आल्या आहेत. पण या घटनेमुळे मात्र चर्चेचे पेव फुटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.