पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
नाशिक : खरा पंचनामा
नाशिक पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नजन (वय 40) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांनी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यातच आत्महत्या केली.
अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या दालनात आज सकाळी पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वत:च्या पिस्तूलातून डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. गेल्या वर्षभरापासून अंबड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अशोक नजन काम करत होते. अतिशय शांत व सोज्वळ स्वभावाचे नजन यांनी आपल्या कामातून वचक निर्माण केला होता.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी आपल्या केबिनमध्ये बसलेले असताना त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.