सराईत गुन्हेगार असिफ दाढी अजित पवारांच्या भेटीला!
पिंपरी : खरा पंचनामा
पिंपरी-चिंचवड येथील सराईत गुन्हेगार असिफ दाढी आसिफ उर्फ दाढी महमद इकबाल शेख (रा. मोरवाडी पिंपरी) याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकतेच कुख्यात गुंड गजा मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर असिफ दाढी याच्या भेटीने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. असिफ दाढी याने अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी अजित पवार यांच्याकडे गेला असल्याची माहिती मिळत आहे.
असिफ दाढी याच्यावर सन१९८८ मध्ये मारहाणीचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लगेचच मारहाणीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. सन १९९६ मध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्न हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, सन २००२ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सन २००४ मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा दुसरा गुन्हा दाखल झाला. सन २००७ मध्ये खुनासाठी अपहरण करून खून असा गुन्हा दाखल आहे. सन २००९ आणि सन २०११ मध्ये शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. सन २०२१ साली त्याच्यावर अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला त्याच्या घरातून शस्त्रासह अटक केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.