Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडी अधिकाऱ्यांची अडचण वाढणार, CM सोरेन यांनी दाखल केली एफआयआर

ईडी अधिकाऱ्यांची अडचण वाढणार, CM सोरेन यांनी दाखल केली एफआयआर



रांची : खरा पंचनामा

सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची प्रत सोरेन यांनी रांचीच्या एसएससीटी- एएससी पोलिस स्टेशनला पाठवली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आरोप केला की, ते आदिवासी समाजातून येतात आणि दिल्लीत ईडीने त्यांचा छळ केला आहे. रांची पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार पाठवली आहे. धुर्वा पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे.'

दरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची त्यांच्या निवासस्थानी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष असलेले सोरेन (48) यांची याआधी 20 जानेवारी रोजी याच प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्या दिवशी चौकशी पूर्ण होऊ शकली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्या दिवशी सोरेन यांची सात तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.