Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुरंदर EVM मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई पुरंदर प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंबित

पुरंदर EVM मशीन चोरी प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
पुरंदर प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंबित



पुणे : खरा पंचनामा

पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पुरंदर प्रांताधिकारी वर्षा लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करुन मुख्य सचिव एस. के. दास यांनी तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात सहायक पोलीस फौजदार डी.एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी (दि.6) निलंबित केले आहे.

पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनाही 12 फेब्रुवारी दुपारी तीन पर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचे डेमो (प्रात्यक्षिक) मशिन चोरीला गेल्यानंतर खळबळ उडाली होती.

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात दोन चोरांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेजुरी येथून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास पोलीस करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये आणखी कोण सामील आहे का? याचा तपास देखील पुणे ग्रामीण पोलीस करीत आहेत.

सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवल्या होत्या. शनिवारी आणि रविवारी अशी दोन दिवस सुट्टी असल्याने तहसील कार्यालय बंद होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँगरुमचे कुलूप तोडलेले आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक मशीन चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.