शरद पवारांची खेळी अजितदादांवर भारी!
राजीनामा दिलेले 137 पदाधिकारी पुन्हा पक्षात
लोणावळा : खरा पंचनामा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, लोणवळ्यातील अजित पवार गटातील या 137 जणांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला.
मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यासोबतच काही दिवसांवर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मोठा धक्का आहे.
आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांच स्वागत झालं. यावेळी तुतारी वाजवण्यात आली. ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.