Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभा निवडणुकीची घोषणा 13 किंवा 14 मार्चला होणार? 7 टप्प्यात पार पडणार मतदान

लोकसभा निवडणुकीची घोषणा 13 किंवा 14 मार्चला होणार?
7 टप्प्यात पार पडणार मतदान



नवी दिल्ली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीकडं आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा १३ किंवा १४ मार्च रोजी होईल, अशी माहिती सूत्रानी दिली आहे.

मार्चच्या मध्यात अर्थात १३ किंवा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारण महिन्याभरानं प्रत्यक्ष निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आचार संहिता निवडणुकी घोषणा झाल्या झाल्याच म्हणजेच १४ किंवा १५ मार्च रोजी लागू शकते.

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक २०१९ प्रमाणेच ७ टप्यात होईल, तर पहिल्या टप्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असंही माध्यमानी आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.