Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हॉटेल ताज लॅण्डसच्या 19 व्या मजल्यावर काय घडतंय ?

हॉटेल ताज लॅण्डसच्या 19 व्या मजल्यावर काय घडतंय ?



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत महायुतीत आणखी एक भिडू येणार आहे. तीन पक्षांची महायुती आता चार पक्षांची होण्याची शक्यता आहे. मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

महायुतीत जाण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली. त्यानंतर आता राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील हॉटेल ताज लँडमध्ये बैठक सुरू आहे. हॉटेलच्या 19 व्या मजल्यावर हे नेते जमले असून त्यात जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाल्याचंही मानलं जात आहे.

हॉटेल ताज लँड एंडच्या 19 व्या मजल्यावर राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. मनसेला किती जागा द्यायच्या याची जुळवाजुळव सुरू आहे. लोकसभेसाठी युतीच समीकरण कसं जुळवायचं यावर चर्चा सुरू आहे. मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम कसा असेल हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मनसेला दोन जागा हव्या असल्याचं सांगितलं जात आहे. शिर्डी किंवा नाशिक आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर मनसेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेला दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डीची जागा सोडली तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर उभे राहण्याचे सांगितलं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.