काँग्रेसकडून लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
महाराष्ट्राबाबत सस्पेंस कायम !
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी केसी वेणुगोपाल यांनी जाहीर केली आहे. राज्य आणि राज्यातील उमेदवारांची नावे वेणुगोपाल यांनी वाचून दाखवली. काँग्रेस दुसऱ्या यादीमध्ये ४३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस खासदार गौरव गौगोई हे आसामच्या जोरहतमधून लढतील. नकुल नाथ मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून निवडणूक लढतील. राहुल कास्वा यांना राजस्थानच्या चुरु मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. वैभव गेहलोत हे जलोरेतून निवडणूक लढवतील.
महाराष्ट्राबाबतचा सस्पेंस अद्याप कायम आहे. राज्यात महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय वंचित बहुजन आघाडीला मविआत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. तुर्तास, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील आणि दमन आणि दिव केंद्र शासित प्रदेशातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची नावे होती. राहुल गांधी हे वायनाडमधून पुन्हा रिंगणात आहेत. शशी थरुर यांना तुरुवनंतपुरममधून पुन्हा संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये १५ उमेदवार खुल्या प्रवर्गातील आणि २४ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समूदायातून होते. दरम्यान, भाजपने पहिली १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपकडूनही दुसरी यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.