Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 9 जागा निश्चित?

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 9 जागा निश्चित?



मुंबई : खरा पंचनामा

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावं दिली आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे.

महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या माढा लोकसभेची
 जागा शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडली आहे. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा धक्का असेल. माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी त्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरु आहे. बारामती, माढा, सातारा, शिरुर, नगर दक्षिण, बीड आणि वर्धा या जागांचा समावेश आहे. रावेर आणि दिंडोरी जागा शरद पवारांकडे आली आहे.

जागा आणि संभाव्य उमेदवार
• बारामती-सुप्रिया सुळे
• माढा-महादेव जानकर (रासप)
• सातारा-बाळासाहेब किंवा श्रीनिवास पाटील
• शिरुर-अमोल कोल्हे
• नगर दक्षिण-निलेश लंके
• बीड-बजरंग सोनवणे किंवा ज्योती मेटे
• वर्धा-अमर काळे

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.