Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुणे-मिरज लोहमार्गाच्या कामाला गती सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता

पुणे-मिरज लोहमार्गाच्या कामाला गती 
सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता



पुणे : खरा पंचनामा

पुणे-मिरज या २८० किमी लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या २१३ किलोमीटर पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१३ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. उर्वरित ६७ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे उद्दिष्ट्ये आहे.

या मार्गावरून प्रवास जलद आणि सुखकर होण्यासाठी प्रवाशांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार असून, लोहमार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठांकडून सतत दौरे करून कामाचा वेळेवर आढावा घेण्यात येत आहे तसेच प्रमुख अडथळे हटवल्याने कामाची गती वाढली आहे. त्यामुळे सहा महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सध्या कऱ्हाड ते सांगली दरम्यान सुमारे ४० किलोमीटर दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. तारगाव ते शिरवडे हा १८ किलोमीटर मार्ग सुरू झाल्याने पुणे-मिरज दुहेरीकरण प्रकल्पाच्या २८० किलोमीटरपैकी २१३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ६७ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य जादा रेल्वे गाड्या धावतील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.