Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर

सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर



पुणे : खरा पंचनामा

पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३०मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणाचे कार्यक्रम आज पार पाडले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार गटाच्या स्थानिक खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरुन वाक्-युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले.

सदर कार्यक्रमात सुरुवातीला सुप्रिया सुळे यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंनी कित्येक दिवस याठिकाणी नगरसेवक नाहीय. अडीच वर्ष निवडणुका न झाल्यामुळे आज या भागातील सर्वसामान्य जनेतेने कोणाकडे जावं?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला. तसेच सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, असं स्वप्न आदरणीय यशंवतराव चव्हाण यांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी नगरसेवकाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे महापालिकेची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतल्यास या भागातील लोकांना आधार मिळेल, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवारांनी भाष्य केलं. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. पण निवडणुका या सुप्रिम कोर्टामुळे थांबलेल्या आहेत. आम्हाला ही वाटतं, आम्हीही लोकांमधून निवडणून आलेले कार्यकर्ते आहोत, असं अजित पवार यांनी म्हणाले. सुप्रिया कोर्टामध्ये ओबीसीचा मुद्दा गेलेला आहे. त्यावर लवकरात लवकर तारीख लागावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतंय, महापालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्या, यामताचं महायुतीचं सरकार आहे, असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.