शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बँक खात्यावरून संघर्ष; 'या' पक्षाचे बँकेला पत्र
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना शिवसेनेने ठाकरे गटाविरुद्ध तक्रार केली आहे. शिवसेनेचा निधी ठाकरे गटाने वापरल्याचा आरोप केला आहे.त्याचवेळी आणखी एक वाद समोर आला आहे. राष्ट्रवाजी काँग्रेसने थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर राजकीय वार केला आहे. राष्ट्रवादीच्या बँकेतील पक्षाच्या निधीवरून दोन्ही पक्ष आमने-सामने आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे खाते असलेल्या बँकेला पत्र पाठवले आहे, अशी माहिती मिळते. या पत्रामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट बँकेला पत्र पाठवले आहे. त्यात आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत, अशी मागणी केल्याची माहिती मिळते. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे. तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करून देऊ नयेत. यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे व्यवहार करून देऊ नयेत, यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बँकेतून पैसे काढण्याचे कुठलेही पाऊल उचलू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय खेळी करत थेट बँकेला पत्र लिहून त्यांच्या परवानगीशिवाय आर्थिक व्यवहार होऊ देऊ नयेत, अशी मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.