Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रखडलेल्या निकालामुळे भावी पीएसआय हवालदील

रखडलेल्या निकालामुळे भावी पीएसआय हवालदील



पुणे : खरा पंचनामा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२१ मध्ये घेतलेल्या अराजपत्रित संयुक्त परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षकांच्या मुलाखती २०२४ मध्ये पार पडत आहे. आता जानेवारी २०२३ मधील भरतीची पुन्हा तीच अवस्था होते का असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. कारण नोव्हेंबरमध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा अजूनही निकाल प्रसिद्ध झालेला नाही.

महाराष्ट्र राजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची मुख्य परीक्षा पार पडली असून, दोनदा अंतिम उत्तरतालीका जाहिर करण्यात आली आहे. आता जवळपास अडीच महिने उलटू गेले तरीही परीक्षेचा निकाल प्रलंबीत. पीएसआयसाठी अर्ज करणारा सूरज सांगतो, "मागच्या भरतीत संयुक्त परीक्षेतील इतर सर्व संवर्गाचे निकाल घोषित करण्यात आले.

मात्र पोलिस उपनिरीक्षकांचा (पीएसआय) निकाल सर्वात उशिरा घोषित करण्यात आला. आता तर इतर सर्व संवर्गाचे निकाल झाल्यानंतरच सर्वात शेवटी पीएसआयचे निकाल घोषित करण्याची चर्चा आहे. असे झाले तर निकाल लागायला २०२५ उजाडेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.