गुरुजी उद्या शाळेत जीन्स घालून येणार!
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी पोशाख आणि ड्रेस कोडबाबत शिक्षकांना आदेश देणारा शासन निर्णय जारी केला आहे. या आदेशाला विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक गुरुवार, दि. २८ मार्च रोजी शाळेत जिन्स घालून येणार आहेत. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने राज्य सरकारच्या विरोधात हा पवित्रा घेत सर्व शिक्षकांना याआंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जगाच्या अनेक कक्षा रुदावत असताना शिक्षकांना विविध बंधने घालणे योग्य नाही. योग्य समाजमान्य पेहराव करुनच सर्व शिक्षक शाळेत जातात, असे असताना ड्रेस कोडच्या नावाखाली शिक्षकांना पोशाखाबाबत बंधने घालणे हे काळाला धरुन नाही. यापूर्वी शासनाने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यालाही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता आणि तो निर्णय हाणून पाडला. हा निर्णयही शिक्षक हाणून पाडतील.
येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर आणि जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.