Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत खासदार महाडिक यांची घोषणा

कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत 
खासदार महाडिक यांची घोषणा



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर-तिरुपती ही बंद झालेली विमानसेवा ३१ मार्च पासून पूर्ववत सुरू होत असल्याची घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने आझमगड येथून देशातील ३४ हजार कोटींच्या रेल्वे, महामार्ग आणि विमानतळ प्रकल्पांचे लोकार्पण आणि शीलान्यास करण्यात आला.

महाडिक म्हणाले, वर्षभरात कोल्हापूरच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देऊ अशी घोषणा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर दोन दिवसात या विमानतळाला राजाराम महाराज यांचे नाव मिळेल असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम स्थळी ११.५५ वाजता आगमन झाले. त्यांना भाषणाला वेळ मिळाला नाही. तत्पूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार खासदार धैर्यशिल माने, खासदार संजय मंडलिक यांची भाषणे झाली.

कोल्हापुरात विमानतळावर झालेल्या कार्यक्रमास विमानतळ जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र यड्रावकर, समरजित घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.