सांगलीत तरूणाच्या खूनप्रकरणी ७ जणांना अटक
गाडी जात नाही म्हणाल्याचे कारण, एलसीबी, विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
सांगलीतील नवीन वसाहत येथे गुरुवारी मध्यरात्री एका तरूणावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. रस्ता बंद असल्याने गल्लीतून गाडी जात नाही म्हटल्याच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सात संशयितांना अटक करण्यात आली. एलसीबी आणि विश्रामबाग पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
अजय उर्फ अजित पांडुरंग खोत (वय २३, रा. वडर गल्ली), सुजित दादासो चंदनशिवे (वय २९, रा. नवीन वसाहत), कुणाल प्रशांत पवार (वय २२, रा. वडर कॉलनी), विकी प्रशांत पवार (वय २३, रा. वडर कॉलनी), गणेश रामाप्पा ऐवळे (वय ३६, रा. गोकुळनगर), अमोल गंगाप्पा कुचीकोरवी (वय २८, रा. वडर गल्ली), अर्जुन हणमंत पवार (वय २२, रा. वडर कॉलनी, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अश्विनकुमार मुळके (वय ३०, रा. नवीन वसाहत) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी या घटनेतील जखमी गणेश हाताळे (रा. नवीन वसाहत) याने फिर्याद दिली आहे.
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास मृत अश्विनकुमार त्याच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी संशयित विकी पवार तेथून दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी अश्विनीकुमार याने रस्ता बंद असल्याने येथून गाडी जात नाही असे सांगितले. त्यानंतर विकीने त्याला त्याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. नंतर विकी तेथून निघून गेला. काही वेळाने तो पुन्हा अन्य साथीदारांना घेऊन तेथे आला. त्यावेळी संशयितांनी अश्विनीकुमार याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेला गणेश हाताळे जखमी झाला. दोघांना तातडीने सांगलीच्या सिव्हील हॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गणेशवर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले. तर अश्विनीकुमारचा गुरुवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांच्या शोधासाठी एलसीबीसह विश्रामबाग पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती. पथकांनी संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली.
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, निलेश माने, तानाजी कुंभार, संदीप कांबळे, संदीप वाघमारे, सचिन धोत्रे, विनायक सुतार, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, सुनील जाधव, विशाल भिसे, बसवराज शिरगुप्पी, दिनेश माने, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, संकेत कानडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.