महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी, कुणाला संधी, कुणाला डच्चू ?
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. या निवडणुकीला कुणाकुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी द्यावी, यासाठी प्रत्येक पक्षांच्या गोटात जोरदार खलबतं आतापर्यंत झाली आहेत.
बऱ्याच ठिकाणी महायुतीतल्या तीनही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या 2 दिवसांत संपण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. सध्याच्या स्थितीत भाजपनं 23 जागांवर निरीक्षकांची नियुक्ती करुन विद्यमान खासदारांच्या 23 जागा लढणारच, असे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 22 जागांची मागणी केलीय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची 10-12 जागांची मागणी आहे.
महायुतीतल्या संभाव्य उमेदवारांची भाजपची यादी
• उत्तर मुंबई - विनोद तावडे किंवा पियूष गोयल • ईशान्य मुंबई मनोज कोटक • उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजनांच्या नावाची शक्यता आहे • बीड - पंकजा मुंडे • सातारा - उदयनराजेंच्या नावाची शक्यता आहे. • चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार किंवा अशोक जीवतोडे • छत्रपती संभाजीनगर - भागवत कराड किंवा अतुल सावे • पुणे - मुरलीधर मोहोळ • धुळे- प्रदीप दिघावकर, नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर • जालना - रावसाहेब दानवे, अकोला - संजय धोत्रे • नागपूर - नितीन गडकरी • नंदूरबार - विजयकुमार गावित किंवा हिना गावित • पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
• रावेर - रक्षा खडसे किंवा केतकी पाटील • शिर्डी - रामदास आठवलेंना भाजप तिकीट देऊ शकते • सोलापूर - अमर साबळे, भंडारा गोंदिया - सुनिल मेंढे • गडचिरोली - चिमुर अशोक नेते • भिवंडी - कपिल पाटील • सांगली - संजयकाका पाटील • दिंडोरी - डॉ. भारती पवार • धाराशीव - बसवराज पाटील किंवा बसवराज मंगरुळे, अमरावती - नवनीत राणा भाजपकडून लढू शकतात. • अहमदनगर - सुजय विखे पाटील
शिंदेंच्या शिवसेनेचेही काही उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे
• दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे • मावळ- श्रीरंग बारणे • वाशिम-यवतमाळ - संजय राठोड • नाशिक - हेमंत गोडसे • बुलडाणा - प्रतापराव जाधव • हातकणंगले - धैर्यशील माने • हिंगोली - हेमंत पाटलांची शक्यता आहे. • वर्धा - रामदास तडस • रामटेक - कृपाल तुमानेंच्या नावाची शक्यता आहे
कोणत्या जागांवर तिढा?
काही जागा अशा आहे की जिथं एकाच जागेवर मित्रपक्षांचाच दावा आहे, ज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत किंवा भाजपकडून नारायण राणेंना मिळू शकते. माढ्यातून भाजपकडून रणजीत निंबाळकर किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर उभे राहू शकतात. रायगडमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे किंवा भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. तर बारामतीत अजित पवारांचीच्याच पत्नीचं नाव निश्चितच आहे. सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित असून नणंद भावजय असा सामना होईल. काही जागांवर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती झालेली नाही. मात्र अंतिम जागा वाटप झाल्यावर पुढच्या 3-4 दिवसांत आणखी चित्र स्पष्ट होईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.