सांगलीतील रघुवीर स्वीटसला भीषण आग
लाखो रूपयांचे नुकसान, जीवित हानी नाही
सांगली ः खरा पंचनामा
सांगली शहरातील प्रसिद्ध असलेले विश्रामबाग येथील रघुवीर स्वीटस या मिठाईच्या दुकानाला गुरुवारी रात्री सातच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तेथील कामगारांनी गॅस सिलींडरसह अन्य साहित्य तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून जीवित हानी झाली नसल्याचे अग्नीशमन विभागाकडून सांगण्यात आले.
शहरातील विश्रामबाग येथे रघुवीर स्वीटस हे अल्पावधीतच नावारूपाला आलेले मिठाईचे दुकान आहे. गुरुवारी रात्री सातच्या सुमारा दुकानाच्या किचनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना लक्षात येताच तेथील कामगारांनी गॅसने भरलेली सिलिंडर तसेच अन्य साहित्य तातडीने बाहेर हलवले. शिवाय याची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन दलाला देण्यात आली. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
एक तासाच्या अथक प्रय़त्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.