Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर नागपूरमधून गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, सांगलीतुन संजयकाकांचा समावेश

भाजपची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर 
नागपूरमधून गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, सांगलीतुन संजयकाकांचा समावेश



नवी दिल्ली : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या दिग्गजांचा समावेश आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, बीडहून पंकजा मुंडे तर पुण्याहून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने महाराष्ट्रातून 20 उमेदवार जाहीर केले आहेत.

महाराष्ट्रातले भाजप उमेदवार : 
नंदुरबार- हीना गावित, धुळे- सुभाष भामरे, जळगाव- स्मिता वाघ, रावेर- रक्षा खडसे, अकोला- अनूप धोत्रे, वर्धा- रामदास तडस.

नागपूर- नितीन गडकरी, चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, नांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकर, जालना- रावसाहेब दानवे, डिंडोरी- भारती पवार, भिवंडी- कपिल पाटील, मुंबई उत्तर- पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा.

पुणे- मुरलीधर मोहोळ, अहमदनगर- सुजय विखे पाटील, बीड- पंकजा मुंडे, लातूर- सुधाकर श्रृंगारे, माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगली- संजयकाका पाटील.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.