आमच्या विमानाचे पायलट विश्वजीत कदम, ते नेतील तिकडे जाऊ
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विशाल पाटील स्पष्टच बोलले
सांगली : खरा पंचनामा
मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे. पण मला जर काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर वेगळा विचार करण्यापेक्षा थांबायची तयारी आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. ते रविवारी पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव- सांगली करतो. राजा- राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो, अशा शब्दांत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांना लक्ष्य केले.
काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करत आहे. तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातोय याचा आनंद आहे. पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडतायत, कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असेही विशाल पाटील म्हणाले. आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र, आता आमची हौस भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजीत पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे म्हणत विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नाही, असे संकेत दिलेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.