Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ताकारीत गांजा विक्री करणाऱ्याला कराडच्या एकास अटक २.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

ताकारीत गांजा विक्री करणाऱ्याला कराडच्या एकास अटक
२.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

जिल्ह्यातील ताकारी येथील भवानीनगर रस्ता परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून २.१७ लाख रूपये किमतीचा सात किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

अमोल सूर्यकांत भोसले (वय २६, रा. शिवनगर, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. पथक इस्लामपूर परिसरात गस्त घालत असताना ताकारी येथील भवानीनगर रस्ता परिसरात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली.  

पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. तेथे एक तरूण सॅक घेऊन थांबल्याचे दिसून आले. त्याचा संशय आल्याने पथकाने त्याला ताब्यात घेऊन सॅकची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये सात किलो गांजा सापडला. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने कराड येथील विराज पाटील याच्याकडून दहा हजार रूपये प्रति किलो दराने खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर गांजा जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माने, उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय कांबळे, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सचिन धोत्रे, संदीप नलवडे, अमर नरळे, उदयसिंह माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.