पहाटेचा शपथविधी ठरवून, मला बदनाम केले!
राजगुरुनगर : खरा पंचनामा
शिवसेनेला बाजुला ठेऊन भाजप बरोबर जायचे आमचे ठरले होते. मात्र अचानक बदल झाल्याने आमचा पहाटेचा शपथविधी वाया गेला. सगळे यांना विचारात घेऊन झाले. मात्र नंतर मला एकट्याला बदनाम करण्यात आले. अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली राजगुरूनगर येथे कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
ते म्हणाले, मी साठीच्या पुढे गेलो तरी पक्षात होणाऱ्या बदलात देखील मला विचारात घेतले जात नव्हते, मला विचारून पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करायचे ठरवले. नंतर परत राजीनामा मागे घेण्यात आला. असे अनेकदा अनुभवले. वारंवार मला टार्गेट केले. याची कल्पना माझ्याबरोबर आलेल्या सगळ्यांना होती. म्हणुन निर्णय घेताना मला सर्वांनी साथ दिली असेही अजित पवार यांनी सांगितले.
आमचे ऐकले असते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारी मंत्री व आमदार सुरतला जाऊ शकले नसते. अनेक राजकिय घडामोडी थांबल्या असत्या. असा खुलासाही शरद पवार यांच्या वर आरोप करीत अजित पवार यांनी केला. २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आपले सरकार होते. अडीच वर्षात दोन वर्षे कोरोना होता. कामे ठप्प होती. ठाकरे कार्यकर्त्यांना फारसे उपलब्ध होत नव्हते. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागात काही जण जास्तच हस्तक्षेप करीत होते. त्यामुळे शिवसेना मंत्री आणि अमदारांत अस्वस्थता पसरली होती. आम्ही 'मोठया साहेबांना' सांगत होतो. ते एकनाथ शिंदे यांना फोन करायचे. शिंदे शेतात असल्याचे सांगायचे. अखेर जे व्हायचे ते झाले असेही अजित पवार यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.