मराठी माणसाच्या हाती राष्ट्रीय तपास यंत्रणेची सूत्रं
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मोठे प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे डायरेक्टर जनरल (DG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, पियूष आनंद यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) च्या डायरेक्ट जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून बुधवारी 27 मार्च रोजी या नियुक्तांबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. आयपीएस राजीव कुमार शर्मा यांना ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) मध्ये DG म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
आयपीएस अधिकारी सदानंद दाते हे त्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळं अनेकदा चर्चेत राहिले आहे. मराठमोळ्या अधिकाऱ्याच्या हाती आता संपूर्ण NIAची सूत्रे असणार आहेत. दाते यांना 2015 मध्ये सीआरपीएफच्या डीजीपदी नियुक्त करण्यात आले होते. हा तो काळ होता जेव्हा छत्तीसगढसह देशातील अनेक भागांत नक्षलवादी कारवायांनी डोकं वर काढलं होतं. त्यानंतर सशस्त्र अभियान राबवण्यात आले होते.
सदानंद दाते हे 1990 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगढच्या गडचिरोलीमध्ये नक्षली मोर्चाच्या काळातही तैनात होते. तर, फेब्रुवारीमध्ये सीआरपीएफमध्ये त्यांना आयजीपदी बढती मिळाली होती. त्यांना सीआरपीएफचे स्पेशल आयजी बनवले होते. त्यानंतर डीजी म्हणून ते सीआरपीएफमध्ये पाच वर्ष नियुक्त होते. आता त्यांच्या हाती एनआयएची धुरा सोपवण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.